‘या’ देशात रेड हार्ट व्हॉट्सअ‍ॅप इमोजी पाठवणे गुन्हा

272

The गडविश्व
जसा देश तसे कायदे आपल्याला पाहायला मिळतात. अनेक देशात कठोर कायदे आहेत. तर काही देशात मवाळ कायदे आहेत. उत्तर कोरियात तर हुकूमशाही असल्याने रोज नविन कायदा उदयास येत असतात . दुसरीकडे सौदी अरब कठोर कायद्यांसाठी कायम चर्चेत असते. सौदी अरबमध्ये गुन्हा करणाऱ्यांसाठी कठोर कायद्याबाबत तुम्ही ऐकले असेलच. सौदी अरेबियामध्ये जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर रेड हार्ट इमोजी पाठवण्याची चूक केली तर तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो. यासोबतच २० लाख रुपयांपर्यंतचा दंडची तरतूद आहे.
सौदी अरेबियात आयटीचे कायदे अतिशय कठोर आहेत. एखाद्याला रेड हार्ट इमोजी पाठवणे हा गुन्हा मानला जातो. असे इमोजी जर कोणी एखाद्याला पाठवले आणि त्या व्यक्तीने त्याबद्दल तक्रार केली तर हा छळ गुन्ह्याच्या कक्षेत येईल. अशा गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण आहे. यामध्ये रेड हार्ट इमोजीचा संबंध लैंगिक गुन्ह्यांशी जोडण्यात आला आहे. अल मोआताज कुत्बी यांनी सांगितले की की “एखाद्या व्यक्तीने तिच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारे किंवा तिच्य नम्रतेचे उल्लंघन करणारे विधान, कृती किंवा हावभाव केलं तर गुन्हा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाबाबतीत छळ अशी व्याख्या केली जाते. या कायद्यानुसार रेड हार्ट इमोजी वापरण्यासही बंदी आहे.”
रेड हार्ट इमोजीबद्दल एखाद्याने तक्रार केली आणि अपराध सिद्ध झाल्यास शिक्षेची तरतूद आहे. पाठवणाऱ्याला १,००,००० सौदी रियालपेक्षा जास्त दंड (जवळपास १९,९०,००० रुपये) किंवा २ वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. जर एकच व्यक्ती या कायद्याचे वारंवार उल्लंघन करत असेल तर त्याला ३,००,००० सौदी रियाल दंड किंवा ५ वर्षे तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here