‘या’ तारखेपासून राज्यातील महाविद्यालये होणार सुरु

218

The गडविश्व
मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालये करण्यात आले होते . मात्र गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. आता या पाठोपाठ राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या १ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यलाये सुरु करण्यात येत असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करुन महाविद्यालये सुरु करण्यात येत असल्याचे आदेश काढण्यात आले आहेत. याबाबत ट्विट करत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंले आहे, ‘दिनांक 1 फेब्रुवारी 2022 पासून राज्यातील महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्या आदेशाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे..महाविद्यालयात येताना विध्यार्थ्यांनी दोन्ही लसिकरण केलेले असणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here