The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ८ सप्टेंबर : तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था खरेदी केंद्र मुरूमगाव येथे खरेदी योजना हंगाम २०२१- २२ मध्ये ९८७८.९५ खरेदी केंद्रावरील पुस्तक साठ्या नुसार गोडावून मध्ये धान्य शिल्लक नसल्याने शासनाचे आर्थिक नुकसान केले असल्याचा ठपका ठेवत कर्तव्यात कसूर केल्याबद्दल धीरज सुंदरलाल चौधरी उपप्रादेशिक व्यवस्थापक व राहुल नानाजी कोकोडे प्रतवारीकर प्रभारी विपणन निरीक्षण उपप्रादेशिक कार्यालय धानोरा यांच्यावर दीपक सिंगल भापप्रसे व्यवस्थापक संचालक म.रा. सह. आदिवासी विकास महाराष्ट्र नाशिक. यांनी निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर मुरुमगाव येथील पोलिस मदत केंद्रात तक्रार दाखल केल्यानंतर काल ६ ऑगस्ट २०२२ ला दुपारी १२.३० वाजता कार्यालयात जावून काही कागदपत्रे पोलिसांनी जप्त केले आहे.
मुरूमगाव धान घोटाळा प्रकरणा बाबत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. संचालक मंडळाच्या पत्रकार परिषदेत सांगितले की संस्थेचा मेन रेकार्ड गडचिरोलीला घेवुन गेलेत तर उर्वरित पोलिसांनी घेवून गेले. मागिल तिन वर्षा पासुनचे शेतकऱ्यांच्या बारदान्याचे पैसेच मिळाले नाहीत. संस्थेच्या संचालक मंडळ बँक खात्याबाबत अनभिज्ञ दिसले. खरच माहीति नाही कि खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असे म्हणायची पाळी आली आहे. तपासणी अधिकारी बावणे उपप्रादेशिक कुरखेडा यांनी १८ ऑगस्ट २०२२ ला मुरुमगाव पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर मुरुमगाव येथील पोलीस मदत केंदात आरोपी विरोधात गुन्हाची नोंद झाल्यानंतर ६ सप्टेंबर ला आविका मुरुमगाव येथिल संस्था कार्यालयातुन काही कागदपत्र सन २०२१-२२ मधिल पोलिसांनी जप्त केल्याचे समजले त्यात खरेदी रजिष्टर, खरिप व रब्बी, साठा रजिष्टर रब्बी, बारदाना रजिष्टर, बिल बुक रब्बी ३ नग, टि.पी.बुक (वाहतूक पास) फक्त २ नग सदर कागद पत्राचा पंचनामा करून पोलिसांनी जप्त केले.
यावेळी तपासणी अधिकारी बावणे उपप्रादेशिक व्यवस्थापक कुरखेडा, मुरुमगाव येथिल पोलिस मदत केंद्राचे तपास अधिकारी जि.एस.आठवे, शासकिय आश्रम शाळेचे शिक्षक , संचालक अजमन राऊत, शिवाप्रसाद भोयर, मुरारी हलामी, श्रीराम चिराम , चावनशहा मडावी उपस्थित होते. तपासात चौधरी दोषी आढळल्सास कारवाई करण्यात येईल. दोषी नव्हते तर निलंबन झाले कसे असाही प्रश्न निर्माण होतो.
– याप्रकरणी कुरखेडा उपप्रादेशिक व्यवस्थापक तपासी अधिकारी बावणे यांच्याशी भ्रमणध्वनीवरुण संपर्क केला असता आविकाचे कार्यालय दाखविण्याकरिता गेलो. आविका कार्यालयातील काही दस्ताऐवज पोलिसांनी जप्त केल्याचे मान्य केले. दोघांना निलंबित केले असता गुन्हा कोकोडे वरच का ? असे विचारले असता कार्यालयात सर्व कामे कनिष्ठ कर्मचारी करित असतात . त्यावर गुन्हा दाखल होईल तसेच तपासात चौधरी दोषी आढळल्सास कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया दिली मात्र दोषी नव्हते तर निलंबन झाले कसे असाही प्रश्न निर्माण होत आहे.