The गडविश्व
चंदीगड : सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री भगवंत मान एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहेत. त्याआधी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आमदारांच्या पेन्शनबाबत मोठी घोषणा केली होती. आता मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज बुधवारी शिक्षण क्षेत्राबाबत दोन मोठे निर्णय घेतले आहेत. खासगी शाळांना फी वाढ करण्यास बंदी घातली आहे. म्हणजेच प्रवेश शुल्कात कोणतीही वाढ होऊ दिली जाणार नाही तर दुसरा मोठा निर्णय आता कोणतीही शाळा कोणत्याही विशिष्ट दुकानातून पुस्तके आणि कपडे खरेदी करण्यास पालकांना सांगणार नाही. पालक आपल्या सोयीनुसार कोणत्याही दुकानातून आपल्या मुलासाठी पुस्तक-ड्रेस खरेदी करू शकतील.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोमवारी देखील एक मोठी घोषणा केली होती. दिल्लीप्रणाणेच पंजाबमध्येही घरोघरी शिधा पोहोचवण्याची घोषणा त्यांनी केली होती. म्हणजेच आता सरकार रेशन घरोघरी पोहोचवणार आहे.
भगवंत मान म्हणाले, रेशन घरोघरी पोहोचवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, ही योजना पर्याय म्हणून राहणार आहे. आमचे अधिकारी कॉल करतील आणि वेळ विचारतील. त्याच वेळी रेशनचे वितरण केले जाईल.
