The गडविश्व
गडचिरोली, ११ नोव्हेंबर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबर पासून भारत जोडो यात्रा सुरू करण्यात आली असून यात्रेचा मुख्य उद्देश देशात निर्माण झालेल्या सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक, राजकीय विषमता धार्मिक भेद दूर करून लोकांना जोडणारी आहे. ही पदयात्रा कन्याकुमारी ते कश्मिर अशी ३५०० किमी चा प्रवास करणार आहे. या पदयात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी शेतकरी, महिला, बेरोजगार, युवक अश्या अनेक नागरिकांशी भेटून संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.
या यात्रेचे महाराष्ट्रात ७ ऑक्टोबर रोजी आगमन झाले असून १७ नोव्हेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील हजारो पदयात्री बाळापूर (अकोला) पासून यात्रेत सहभागी होणार आहेत. या संदर्भात जनजागृती करण्याकरीता गडचिरोली शहरातून जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी प्रदेश महासचिव तथा जिल्हा निरीक्षक डॉ. नामदेव किरसान, जि. प. माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवी वासेकर, शहर अध्यक्ष सतीश विधाते, तालुका अध्यक्ष वसंत राऊत, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, माजी नगरसेवक रमेश चौधरी, राजेश कात्रटवार, दीपक मडके, अनुसूचित सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन विभाग अध्यक्ष रुपेश टिकले, सहकार सेल अध्यक्ष शामराव चापले, किसान सेल अध्यक्ष वामराव सवसाकडे, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, जिल्हा कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, जिल्हा उपाध्यक्ष तेजस मडावी, जिल्हा सचिव सुनील चटगुलवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, विजय गोरडवार, संजय कोचे, विवेक ब्राह्मणवाडे, प्रसाद पवार, शहर उपाध्यक्ष राकेश रत्नावार, सुरेश भांडेकर, दिवाकर निसार, अब्दुल पंजवानी, हरबजी मोरे, सुभाष धाईत, पुष्पलता कुमरे, कल्पना नंदेश्वर सह शेकडोच्या संख्येने युवक, काँग्रेस नेते पदाधिकारी सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा सुद्धा विशेष सहभाग होता.
