भंगाराच्या गोडाऊनमध्ये भीषण आग : ११ जणांचा होरपळून मृत्यू

458

The गडविश्व
तेलंगणा : हैदराबादमध्ये भंगाराच्या गोडाऊनमध्ये लागलेल्या भीषण आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या आगीतून एक कामगार स्वत:चा जीव वाचवण्यात यशस्वी ठरला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, १२ कामगार पहिल्या माळ्यावर झोपले होते या दरम्यान तळमजल्यावर असलेल्या गोडाऊनला आग लागली. यावेळी कामगारांना तेथून बाहेर पडण्यासाठी तळमजल्यावरुन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र शटर बंद होते असे सेंट्रल झोनचे डीसीपी राजेश चंद्रा यांनी सांगितले आहे.
आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला पहाटे ३ वाजता मिळाली आणि त्यानंतर ९ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. तब्बल तीन तास अग्निशमन दलाचे जवान आग विझवत होते. “एक कामगार इमारतीमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाला असून त्याला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,” अशी माहिती हैदराबादचे पोलीस आयुक्त सी व्ही आनंद यांनी दिली आहे.
गोडाऊनमधील फायबर केबलमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मृत्यू झालेले अनेकजण हे स्थलांतरित कामगार असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here