बस पलटून भीषण अपघात : आठ जणांचा मृत्यू

765

– २० हून अधिक गंभीर
The गडविश्व
बंगळुरु : तुमकूर जिल्ह्यातील पावागडाजवळ बस पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात आठ जण ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी झाल्याचेही कळते. यामध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. तुमकूर पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. तर बसमध्ये सुमारे ६० प्रवासी असल्याची माहिती आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, २० जखमींपैकी ८ जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत आणि जखमींमध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here