फोडणी होणार स्वस्त : केंद्र सरकारने खाद्यतेल दर कमी करण्याचे दिले निर्देश

712

– प्रमुख खाद्यतेल विक्रेत्या संघटनांना दरात तातडीने १५ रूपयांची कपात करण्याचे दिले निर्देश
– किमती कमी झाल्याचा लाभ त्वरित ग्राहकांपर्यंत पोहचवला पाहिजेः अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग

The गडविश्व
नवी दिल्‍ली, ९ जुलै : अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने ६ जुलै २०२२ रोजी झालेल्या बैठकीत, प्रमुख खाद्यतेल विक्रेत्या संघटनांना खाद्यतेलाच्या किमती १५ रूपयांनी त्वरित कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता फोडणी स्वस्त होणार आहे.
केंद्र सरकारने असाही सल्ला दिला आहे की उत्पादक आणि तेल शुद्धीकरण कारखान्यांकडून वितरकांना दिल्या जाणाऱ्या दरातही कपात करण्याची आवश्यकता आहे ज्यामुळे दरकपात कोणत्याही मार्गाने निष्फळ ठरू नये. सरकारतर्फे यावर जोर देऊन सांगितले आहे की, जेव्हा जेव्हा दर कमी होतील, तेव्हा उत्पादक आणि तेल शुद्धीकरण कारखान्यांनी त्याचा लाभ ग्राहकांना त्वरित दिला पाहिजे आणि विभागाला त्याबाबत नियमित माहिती दिली जावी. ज्या कंपन्यांनी अजूनही खाद्यतेलाच्या किमती कमी केलेल्या नाहीत आणि त्यांची कमाल किरकोळ किंमत अजूनही इतर ब्रँड्सपेक्षा जास्त आहे, त्यांनाही किमती कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आयात केलेल्या खाद्यतेलाच्या किमतीत घट होत असून हा खाद्यतेलाच्या संदर्भात अत्यंत सकारात्मक कल आहे, त्यामुळे देशांतर्गत खाद्यतेल उद्योगाने त्यास अनुरूप अशा देशांतर्गत बाजारपेठेतही किमती खाली येतील, याची सुनिश्चिती करण्याची आवश्यकता आहे, यावर बैठकीत चर्चा झाली. आणि ही तेलाच्या दरातील कपात ग्राहकांपर्यंत अत्यंत त्वरित आणि कसलीही टाळाटाळ न करता पोहचवली पाहिजे, असेही बैठकीत सांगण्यात आले. किमतींची माहिती गोळा करणे, खाद्यतेलावरील नियंत्रणाचा आदेश आणि खाद्यतेलाचे पॅकेजिंग यावरही बैठकीत चर्चा झाली.
मे २०२२ मध्ये, प्रमुख खाद्यतेल संघटनांची बैठक विभागाने बोलवली होती आणि सूत्रांनी सांगितल्यानुसार, एक लिटरच्या फॉर्च्युन रिफाईन्ड सनफ्लॉवर तेलाच्या पाकिटाची किमत २२० रूपयांवरून २१० रूपयांवर आणली होती तसेच सोयाबीन (फॉर्च्युन) कच्ची घानी तेलाच्या एक लिटर पॅकची किमत २०५ रूपयांवरून १९५ रूपयांवर आणली होती, याची आठवण ठेवणे आवश्यक आहे. तेलाच्या दरातील घट केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी करून ते स्वस्त केल्याच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. ग्राहकांना निर्विवादपणे तेलाच्या दरकपातीचा संपूर्ण लाभ दिला जावा, असा सल्ला उद्योगाला देण्यात आला होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाच्या भावात अत्यंत वेगाने घट होत असल्याचे चित्र दिसत असताना ,स्थानिक बाजारात मात्र परिस्थिती वेगळीच आहे, इथे खाद्य तेलाचे भाव हळूहळू कमी होताना दिसत आहेत. या पार्श्वूमीवर भारत सरकारने पुढाकार घेऊन एक बैठक आयोजित केली होती. आंतरराषट्रीय बाजारात खाद्य तेलाचे भाव घटले असताना देशात खाद्य तेलाचे भाव कसे कमी करता येतील याचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने देशातील प्रमुख उद्योग प्रतिनिधींसह SEAI,IVPA, आणि SOPA या कंपन्यांच्या प्रतिनिधीची बैठक घेतली . आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या महिन्यात वेगवेगळ्या खाद्य तेलांचे भाव प्रती टन 300-400 डॉलरने(USD) कमी झाले आहेत.स्थानिक बाजारात याचे परिणाम दिसायला काही वेळ लागेल. येत्या काही दिवसात खाद्य तेलाच्या घाऊक किमती कमी होताना दिसतील,असे या बैठकीत उपस्थित उद्योजकांनी सांगितले. देशातील खाद्य तेलाच्या किंमती आणि खाद्य तेलाची उपलब्धता यावर विभाग सतत लक्ष ठेवून आहे. खाद्य तेलावरचा अधिभार कमी करण्याचा निर्णय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत सातत्याने होत असलेली घट बघता याचा फायदा न चुकता ताबडतोब अगदी शेवटच्या ग्राहकाला झाला पाहिजे हा यामागचा हेतू आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे ग्राहकाचा खाद्य तेलावरचा खर्च काही प्रमाणात कमी होणार आहे हे निश्चित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here