प्रसिद्ध गायक ‘केके’ यांचे लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन

421

The गडविश्व
कोलकाता : प्रसिद्ध गायक केके (Krishnakumar Kunnath) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. कोलकाता येथील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना CMRI रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. केके यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे. कार्यक्रमादरम्यान मंचावरच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. बॉलिवूडमधील 200 हून अधिक सुपरहिट गाणी त्यांनी गायली आहेत. ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमातील ‘तडप तडप के इस दिल से’ हे त्यांचं गाणं लोकप्रिय झाले होते. केके यांचा कोलकाता येथील विवेकानंद कॉलेजमध्ये कार्यक्रम होता. केके यांनी स्वत: या कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here