पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयातून इसमाची हत्या

963
File Photo

– नक्षल्यांनी पत्रके टाकून पोलीस खबऱ्या असल्याचा लावला आरोप
The गडविश्व
कोंडागाव : छत्तीसगडच्या कोंडागाव जिल्ह्यात नक्षल्यांनी पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून एका गावकऱ्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटना मर्दापाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे समजते. सुमाराम मंडावी असे मृतकाचे नाव आहे.
छत्तीसगडच्या कोंडागाव जिल्ह्यातील मर्दापाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अडवल गावातील तोडाबेडा पारा येथे काल शनिवारी रात्रोच्या सुमारास काही सशस्त्र नक्षली पोहचले व सुमराम मांडवीची गोळ्या झाडून हत्या केली.दरम्यान हत्या केल्यानंतर नक्षली जंगलाच्या दिशेने निघाले असल्याची माहिती आहे तर मुतदेहाजवळ नक्षल्यांनी पत्रकही टाकले असून पत्रकात म्हटले आहे की सुमाराम मंडावी पोलीस खबऱ्या आहे त्यामुळे हत्या करण्यात आली.
कॉम्रेड वर्गेशला मारण्यात सोमाराम हा पोलिसांचा खबरी होता त्यामुळे त्याला शिक्षा सुनावण्यात आली असेही पत्रकात म्हटले आहे. सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सदर घटनेला कोंडागावचे एसपी दिव्यांग पटेल यांनी दुजोरा दिला असून. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी रवाना झाल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here