पुनर्वसित मौजा सिनाळा हे गाव “महसुली गाव” म्हणून घोषित

235

The गडविश्व
चंद्रपूर : महसूल व वन विभागाच्या शासकीय अधिसूचना दि. 1 जुलै 1976 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 (सन 1966 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 41) अन्वये कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे. त्या अधिकाराचा वापर करून नवीन सिनाळा तह.चंद्रपूर या महसूल गावाचे मौजा दुर्गापूर येथील सर्वे क्रमांक 12 ते 17 व 73 व 74 चा भाग व रस्त्यामध्ये पुनर्वसन केलेल्या गावाला महसुली गावाचा दर्जा देण्याबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी अंतिम अधिसूचना काढली आहे.
त्याद्वारे 24 जानेवारी 2022 पासून चंद्रपूर जिल्ह्याच्या, चंद्रपूर तालुक्यातील पुनर्वसित सिनाळा, मसाळा जुना, नवेगाव या गावाचे निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व चंद्रपूर जिल्ह्याच्या ,चंद्रपूर तालुक्यातील नवीन सिनाळा नावाने ओळखण्यात येणाऱ्या महसुली गावात रुपांतर करण्यात येत आहे. असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here