पाच राज्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला : सात टप्प्यांत होणार निवडणुका

269

– मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांची पत्रकार परिषदेतून माहिती

THE गडविश्व

नवी दिल्ली : गोवा, मणिपुर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी तब्बल ६९० जागांसाठी मतदान पार पडणार आहे. या निडणुकांमध्ये कोरोनाचेही आव्हान असणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज निवडणूक आयोगाने पत्रकार परीषद घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा (CEC) यांनी याबद्दल निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या तयारीची तपशीलवार माहिती दिली. “यकीन हो तो कोई रास्ता निकलता है हवा की ओट की ख़िलाफ़ भी दिया जलता है।” कोरोना महामारी से निकलेंगे हमे यकीन है! या शायरीच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्वा आव्हांनाचा सामना करत निवडणूका घेतल्या जातील असे स्पष्ट केले.
उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत 7 टप्प्यात मतदान होणार आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारीला आणि मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला मतदान होणार आहे. सर्व पाच राज्यांची मत मोजणी 10 मार्च रोजी होईल.
सर्व निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फ्रंट लाईन वर्कर मानले जाईल. त्यानुसार सर्व पात्र अधिकाऱ्यांना ‘सावधगिरीचा डोस’ देऊन लसीकरण केले जाईल.
सर्व राजकीय पक्षांना त्यांच्या वेबसाइटवर गुन्हेगारी प्रकरणे प्रलंबित असलेल्या निवडणूक उमेदवारांची सविस्तर माहिती अपलोड करणे बंधनकारक आहे. त्यांना उमेदवार निवडण्याचे कारणही द्यावे लागणार आहे.
सर्व मतदान केंद्रांवर EVM आणि VVPAT चा वापर केला जाईल. निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाने आधीच पुरेशा प्रमाणात ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीची व्यवस्था केली आहे.
ओमिक्रॉन या नव्या व्हेरीअंटमुळे कोविडची प्रकरणे वाढत असल्याने, निवडणूक आयोगाने केंद्रीय आरोग्य सचिव आणि गृह सचिव, तज्ञ आणि राज्यांचे आरोग्य सचिव यांच्यासोबत बैठका घेतल्या. सर्वांची मते आणि परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर, ECI ने सुरक्षिततेच्या निकषांसह निवडणुका जाहीर करण्याचा निर्णय घेतला असे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here