नक्षल्यांनी घडवून आणला आयईडी स्फोट : एक जवान शहीद

591

– रस्ते बांधणीच्या कामात सुरक्षा पुरवण्यासाठी निघाले असता झाला स्फोट
The गडविश्व
नारायणपूर : छत्तीसगडमध्ये नक्षली कृत्य थांबता थांबेना. आज पुन्हा पोलिसांना लक्ष करीत आयईडीचा स्फोट घडवला आहे. या स्फोटात एक जवान शहीद झाला आहे तर एक जवान जखमी झाला आहे. सदर घटना सोनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेनंतर जवानांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. राजेंद्र सिंह असे या शहीद जवानाचे नाव आहे. ते आयटीबीपी मध्ये एएसआय म्हणून कार्यरत होते. तर महेश असे जखमी जवानाचे नाव आहे.
नारायणपुरचे एसपी सदानंद कुमार यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोनपूर ते ढोडरीबेडा दरम्यान रस्ता बांधणीचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी आयटीबीपीचे जवान सकाळीच सुरक्षा पुरवण्यासाठी बाहेर पडले होते. यावेळी रस्त्यावरून चालत जात असतांना अचानक एका जवानाचा पाय आयईडीच्या वर आला स्फोट झाला. यात एक जवान शहीद झाला तर एक जवान जखमी झाला आहे. जखमी जखमी जवानाला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर जवानांनी घटनास्थळी शोधमोहीम सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. बीडीएस टीम घटनास्थळी शोध घेत आहे. घटनास्थळी आणखी आयईडी असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर महेश असे जखमी जवानाचे नाव आहे.
दरम्यान बस्तरच्या सुकमा जिल्ह्यात काल रविवारी सकाळी पोलिस-नक्षल चकमक झाली. ज्यात २ डीआरजी जवान जखमी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here