नक्षल्यांनी गळा चिरून केली इसमाची हत्या

1879

– पोलीस खबऱ्या असल्याचा लावला आरोप, मृतदेहाजवळ टाकले पत्रक
The गडविश्व
कांकेर : जिल्ह्यात नक्षल्यांनी इसमाची पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्त्या केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. नक्षल्यांनी हत्या केल्यानंतर सदर व्यक्तीचा मृतदेह रस्त्याच्या मधोमध टाकून दिला. तसेच मृतदेहाजवळ नक्षल्यांनी एक पत्रकही टाकले त्यात त्यांनी लिहले की सदर इसम हा पोलीस खबऱ्या असल्याने त्याला ही शिक्षा देण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, आज रविवारी सकाळच्या सुमारास कोयलीबेडा ते मारकनार मार्गावर काही नागरिकांना मृतदेह आढळून आला. लगेच याची माहिती पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे लगेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मौका पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. दरम्यान मृतदेहाजवळ एक पत्रक आढळला त्यात सदर व्यक्ती हा पोलिसांना आमची माहिती देतो त्या कारणाने त्याला ही शिक्षा देत आहोत – रावघाट एरिया कमिटी असे नमूद करण्यात आले आहे. सदर हत्येची जबाबदारी रावघाट एरिया कमिटीने घेतली आहे. पत्रकात मृतक व्यक्तीचे नाव नसल्याने सदर मृतक व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पुढील तपास पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here