नक्षल्यांनी आणखी दोघांची केली हत्या

460

– पोलीस खबऱ्या असल्याचा आरोप लावत आपल्याच साथीदारांची केली हत्या

The गडविश्व
बिजापूर : छत्तीसगढच्या नक्षलग्रस्त बीजापुर जिल्ह्यातील भैरमगढ परिसरातील बेलचरच्या बुधीपारा येथे रात्रोच्या सुमारास नक्षल्यांनी दोन युवकांची पोलीस खबऱ्याचा आरोप लावत हत्या केल्याची घटना घडली. पोडीयामी दिनेश व पोयाम बोंगी असे हत्या करण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत.
बीजापुरचे पोलीस अधीक्षक कमलोचन कश्यप यांनी सांगितले की पोडीयामी दिनेश व पोयाम बोंगी वर विविध पोलीस ठाण्यात हत्या, अपहरण व लूटमार आदी गुन्हे दाखल आहेत. हत्या करण्यात आलेले युवक हे नक्षल्यांचेच जुने साथीदार आहेत. तसेच पश्चिम बस्तरमध्ये नक्षल्यांचा आपआपसात भांडण व गॅंगवार होत चाललेला आहे असेही पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here