नक्षल्यांचा मोठा घातपाताचा कट उधळण्यात गडचिरोली पोलीस दलास यश : जिवंत कुकर बॉम्बसह अनेक स्फोटक साहित्य जप्त

790

– पुरून ठेवलेल्या स्फोटकांसह अनेक साहित्य जप्त
– टिसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर नक्षल्यांना जबर धक्का

The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पुराडा पोलीस स्टेशन हद्दीतील जामटोला, बंजारी रिठ जंगल परिसरात नक्षल्यांनी मोठ्या घातपाताच्या उद्देशाने पुरून ठेवलेल्या दारुगोळा, स्फोटक साहित्य विशेष अभियान पथक व बी.डी.डी.एस पथकाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवून जप्त करत नक्षल्यांचा मोठा घातपाताचा कट उधळून लावण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश आले आहे.
उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पुराडा पोलीस स्टेशन हद्दीतील जामटोला, बंजारी रिठ जंगल परिसरात कोरची एलओएस, टिपागड एलओएस व कंपनी क्र. ०४ च्या नक्षल्यांनी पोलीस पथकांना नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याचे उद्देशाने मोठ्या प्रमाणात दारूगोळा, स्फोटके व इतर साहित्य पुरून ठेवले असल्याची गोपनिय माहिती मिळाली असता त्या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांचे मार्गदर्शनाखाली कुरखेडा उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांचे नेतृत्वात नक्षलविरोधी अभियानाचे आयोजन करून विशेष अभियान पथक व बी.डी.डी.एस. पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना नक्षल्यांनी गोपनियरित्या जंगलपरिसरात लपवून ठेवलेला शस्त्र, स्फोटकांचा साठा शोधून काढण्यात जवानांना खुप मोठे यश आले आहे.
घटनास्थळावरून १ नग जिवंत कुकर बॉम्ब व ०४ नग कुकर असे एकुण ०५ कुकर, जिवंत डेटोनेटर ०१ नग, जिलेटीन (जेली) ०४ नग, स्प्रिन्टर लोखंडी तुकडे ०६ नग, गन पावडर ४५ ग्रॅम मोबाईल चार्जर स्विच ०१ नग, तुटलेला मोबाईल चार्जर ०१ नग, नक्षल शर्ट ०१ नग, नक्षल पॅन्ट ०१ नग व नक्षल पुस्तके तसेच इतर साहित्य मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आले आहे. यापैकी जिवंत कुकर बॉम्ब हे बीडीडिएस पथकाच्या मदतीने अत्यंत सतर्कतेने यशस्वीरित्या जागेवरच नष्ट करण्यात आले असून इतर साहीत्य गडचिरोली येथे आणण्यात आलेले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे.
जिल्हयामध्ये नक्षल घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारच्या शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात, असे साहित्य ते मोठया प्रमाणात खरेदी करुन ठेवतात व जंगल परिसरातील जमिनीत गोपनियरित्या पुरुन ठेवतात. तसेच काही ठिकाणी रस्ते तसेच सुरक्षा दलांना धोका होवू शकेल अशा इतर ठिकाणी स्फोटके, शस्त्र साहित्य व दारुगोळा इत्यादी ते गोपनियरित्या जमिनीत पुरुन ठेवतात.
टिसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर सदर डंप हस्तगत केल्यामुळे या भागात नक्षलवादयांना मोठा हादरा बसलेला आहे. त्यामुळे नक्षल्यांच्या लक्षात आलेले आहे की, गडचिरोली पोलीस दलाची नजर नक्षल्यांवर असुन सामान्य नागरीकांना वेठीस धरुन बळजबरीने टिसीओसी सप्ताह पाळावयास भाग पाडणे नक्षल्यांना आता अडचणीचे ठरणार आहे.
सदर कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी अभियानात सहभागी असलेल्या विशेष अभियान पथक व बीडीडीएस पथकाचे कौतुक केले आहे. तसेच जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here