धानोरा : पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, दोघेजण जखमी

1292

– कन्हाळगाव- रांगी मार्गावर अपघात
The गडविश्व
ता.प्रतिनिधी / धानोरा :  तालुक्यातील कन्हाळगाव- रांगी मार्गावर पिकअपच्या दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, तर दोघे जण जखमी झाल्याची घटना आज २४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. रामदास मनोहर हलामी (५३) रा. रांगी असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, रामदास हलामी हे सिताटोला येथे एमएच ३३ एल १५८७ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने जात होते. दरम्यान कन्हाळटोला गावानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच ३३ टी २८७३ क्रमांकाच्या टाटा पिकअप वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यात रामदास हलामी यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघेजण जखमी असल्याचे कळते. अपघात होताच पिकअप वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असल्याचेही कळते. गाडीमालकाचे नाव कळू शकले नाही. बातमी लिहेस्तव घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here