धानोरा जि. प. शाळेने कबड्डीत स्पर्धेत मिळविला तालुक्यात प्रथम क्रमांक

240

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २३ नोव्हेंबर : तालुक्यातिल सर्व शाळेतील तालुका स्तरीय क्रीड़ा स्पर्धा चातगाव येथे २१ नोव्हेंबर रोजी सुरु झाल्या या कबड्डी स्पर्धेत जि. प. शाळा धानोरा ने तालुक्यातुन प्रथम क्रमांक पटकाविला. धानोरा तालुक्यातिल १७ व १९ वर्ष वयोगटातील दोन्ही गटातील चमुनी अंतिम फेरीत धडक मारत अंतिम सामन्यात दणदणीत विजय मिळवित धानोरा तालुक्यात प्रथम स्थान पटकविला मिळविला. . तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या या चमुची जिल्हा प्रतियोगिते साठी निवड झाली आहे. विजयी दोन्ही चमुचे प्राचार्य डी. टी. कोहडे यांनी संघ वेवस्थापक पी. बी. तोटावार शिक्षक व ओम देशमुख यांचे अभिनंदन केले. तसेच प्रशांत साळवे शिक्षक, डॉ. रश्मि डोके मॅडम, अशोक कोल्हटकर, रजनी मॅडम, रत्नागिरी , विजय बुरमवार, हेमके मॅडम, मोहन देवकते, प्रवीण सहारे, निनावे मॅडम व सर्व कर्मचारी वृंदानी विजयी चमुचे व संघ व्यवस्थापक पी. बी. तोटावार व ओम देशमुख यांचे अभिनंदन केले आहे आणि पुढील जिल्हा प्रतियोगीते करता शुभेच्छा दिल्या आहे.

#dhanora #gadchiroli #kabaddi #zp gadchiroli #sportnews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here