धक्कादायक : मिरवणुकीदरम्यान विजेचा धक्का लागून लहान मुलांसह ११ जणांचा मृत्यू

522

– किरकोळ जखमी झालेल्या चौदा जणांवर रुग्णालयात उपचार
The गडविश्व
चेन्नई : तामिळनाडूच्या तंजोरमध्ये आज सकाळच्या सुरमारास मोठी दुर्घटना घडली आहे. मंदिरात मिरवणुकीदरम्यान विजेचा धक्का लागून ११ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कदायक माहिती समोर येत आहे. यात लहान मुलांचाही समावेश असल्याचे कळते. तर किरकोळ जखमी झालेल्या चौदा जणांवर तंजोर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना तंजोर जिल्ह्यातील असून ती रथ मिरवणुकीदरम्यान घडली आहे. जिवंत विद्युत तार रथाच्या संपर्कात आल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
मंदिरात ९४ वा उच्च गुरुपूजा उत्सव साजरा केला जात असून, मंगळवारी रात्रीपासूनच आजूबाजूच्या परिसरातून भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यादरम्यान बुधवारी सकाळी शहरातील रस्त्यांवर पारंपरिक रथयात्रा काढण्यात आली. देवाचा रथ ओढण्यासाठी शेकडो भाविकांमध्ये स्पर्धा सुरू असताना अचानक विजेच्या तारेचा स्पर्श रथाला झाला आणि करंट लागून २ लहान मुलांसह ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर करंट लागून जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. तर, 11 जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here