धक्कादायक : एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात तरूणीची हातोड्याने डोक्यावर वार करून हत्या

541

– रावणवाडी तालुक्यातील घटना
The गडविश्व
गोंदिया : जिल्हयातील रावणवाडी तालुक्यात एकतर्फी प्रेमातून तरूणीची भररस्त्यात हातोड्याने मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना काल २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सुमारास रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या झिलमिली चिरामनटोला रस्त्यावर घडली. धनश्री गोपाल हरिणखेडे (१८) रा. चिरामनटोला ता. गोंदिया असे मृत तरूणीचे नाव आहे. दुर्गाप्रसाद गणेश रहांगडाले (२३) असे आरोपीचे नाव आहे.
मृतक तरुणी हि शिकवणी वर्गासाठी जात असताना तिच्यावर प्रेम करणाऱ्या माथेफिरू प्रियकराने हतोड्याने डोक्यावर वार करून तिची हत्या केली. यावेळी तरुणी रक्तबंबाळ झाली होती. घटनेची माहिती मिळताच रावणवाडीचे ठाणेदार उध्दव डमाळे यांनी घटनास्थळ गाठून त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरूणीला गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी त्या माथेफिरू प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here