देसाईगंज : शहरातील हत्या प्रकरणी चार आरोपींच्या आवळल्या मुसक्या

815

– १८ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी

The गडविश्व
देसाईगंज, १६ ऑक्टोबर : शहरातील आंबेडकर वार्डातील आशिष मेश्राम नामक युवकाची हत्या करून मृतदेह शहरातील भगतसिंह वार्डनजीकच्या नहरात फेकुन दिल्याची घटना उघडकीस आली होती याप्रकणी पोलीसांनी आतापर्यंत चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशााल रेकडे, दुर्योधन गाधाडे (१८) शंकरपूर, संतोष मेश्राम (२२) रा. आंबेडकर वार्ड, निकेश अलोणे(२२) रा. कस्तुरबा वार्ड असे आरोपींची नावे आहेत.
सदर प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल रेकडेला दुसऱ्याच दिवशी अटक करण्यात आली होती तर पुन्हा तिघांना शुक्रवारी अटक करण्यात पोलीसांना यश आले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता १८ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावाली आहे.
मंगळवारच्या रात्री आशिष मेश्राम याला फोन येताच पत्नीला पाच मिनीटात परत येतो असे सांगुण घराबाहेर पडला. मात्र रात्रो उशिरा पर्यंत घरी परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळच्या सुमारास आशिषचा मृतदेह भगतसिंह वार्ड तुकुम वार्डाजवळील नहरात मिळून आला. याप्रकरणी देसाईगंज पोलीसांनी पंचनामा करून पुढील तपास केला असता दुसऱ्या दिवशी विशाल रेकडे यास अटक केली व इतर तिन अरोपींना शुक्रवारी अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता १८ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here