The गडविश्व
सावली : तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या वैनगंगा नदीच्या काठावरील या तीर्थस्थानी आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने खासदार अशोक नेते यांच्या हस्ते आज शिलापुजन करण्यात आले. यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष परम पूज्य संत मुरलीधर महाराज उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, भाजपा अध्यक्ष अविनास पाल, सतीश बोम्मावार भा ज पा महामंत्री तथा नगसेवक सावली, नगसेवक न. प. सावली सौ.निलीमाताई सुरमवार, नगराअध्यक्ष न. प .मुल सौ रत्नमालाताई भोयर, न. प. नगरसेविका सौ.शारदाताई गुरनुले सावली, ग्रामपंचायत साखरी सरपंच ईश्वरदास गेडाम, उपसरपंच दादाजी पा. किनेकार, नारायनजी गंदेवार, देवराव सा. मुदमवार, आरोग्य अधिकारी जोगडन, आरोग्य सेविका पुनवटकर, सा. आ. अ. वृषाली गौ. थुल आणि कु. प्रगती रामटेके त्याचप्रमाणे इतर मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.
खासदार अशोक नेते यांनी दिलेला शब्द पाळला यामुळे या वेळी श्री पुण्यभूमी देवस्थान खंडेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने त्यांचे आभार मान्यण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक परमपूज्य संत मुरलीधर महाराज तर संचालन जकुलवार, आभार डॉ.पवन कवठे यांनी मानले. यावेळी श्री पुण्यभूमी मुरकुंडेश्वर ट्रस्ट चे सचिव नरेश जक्कुलवार, गुणाजी ठोंबरे, नामदेव हजारे, सूरज बोम्मावार, भास्कर पोवनवार, राकेश गोलेपल्लीवार, प्रतीक संगीळवार, निलखंठ फाले, कवेशर पुल्लीवार, यांच्या सह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.
