The गडविश्व
चंद्रपूर : जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव येथील तरुणाने आपल्या मोबाईलवरील व्हॉट्सॲपवर ‘सॉरी’ असा स्टेट्स ठेवून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. संतोष मुरलीधर पिपळशेंडे (२८) रा. नांदगाव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी रात्री आई गावात असणाऱ्या मुलीकडे झोपायला गेली होती तर वडील शेतात जागलीला गेले होते. घरी कुणी नसल्याची संधी साधत संतोषने आपल्या व्हॉट्सॲपवर ‘सॉरी’ असा स्टेटस ठेवत विष प्राशन करून आत्महत्या केली. प्रेमात भंग झाल्याने हे कठोर पाऊल उचलले असावे, असा अंदाज नागरिकांकडून वर्तविला जात आहे. घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.