फाटलेल्या चपलाच्या छिद्रातून दुनियेकडे मोठ्या आशेने पाहिले !
सुटाबुटात भीक मागणारे आरामदायी खुर्चीवर बसून एसीच्या खोलीत टेबला खाली भीक मागणारे, नि …
वर जरा पूज्य म्हणून चार दाणे दानपेटीत टाकणारे व
कुठे पाहिले तर फॅशन म्हणून फाटलेले कपडे घालणारे
बफे पार्टी च्या नावाखाली अन्नाला पायाखाली तुडवणारे…
दारूच्या पार्ट्यावर हजारो खर्च करणारे …
आहे ते लपविणार व नाही ते दाखविणारे …
मन चप्पल बद्दलली मंग दुसऱ्या चपलेच्या छिद्रातून
पुन्हा दुनियेकडे पहिलं जे दिसलं ते पहायची हिम्मत नव्हती
उपाशी लेकराला उपाशी माय सुकलेल्या छातीतून दूध काढून पाजण्याच्या प्रयत्नात डोळ्यातील आसवेच वेचत होती …
सीमेवर लढणाऱ्या भावाची वाट आसुसलेल्या डोळ्यांनी बहीण पाहत होती ,…
सुकलेल्या जमिनीत नांगर गाडून बैलाच्या हाडाचा सांगोळा जपून बिन पाण्याच्या ढगाकडे टक लावून पाहणारा बळीराजा शेतकरी …
आपणच लंगडा केलेल पोरगं रस्त्याच्या कडेला भीक मंगताना चप्पल पायात घातली तसी आजू बाजूची मंडळी मला पाहून हसली म्हणाली वेळ कुठली ज्याचं नशीब असते !…
कुणी हसतं तर कुणी रडत आपण फक्त आपलं पहायचं असतं फाटलेल्या चप्पला पायात घालून जगासमोर चालत राहायचं असतं …
– दिशा देवेंद्र बांबोळे
नवेगांव- मुर्खळा ( गडचिरोली)