जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मेटीगुड्ड्म येथील नागरिकांशी केली चर्चा

149

– दिवाळी निमित्याने महिला साड़ी वितरण
The गडविश्व
अहेरी, २५ ऑक्टोबर : तालुक्यातील देचलीपेठा ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या गाव परिसरात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दौरा करून मेटीगुड्ड्म येथे सभा घेऊन गांवात नागरिकांशी सखोल अशी चर्चा केली.
अहेरी तालुका मुख्यालयापासून ७० कि.मि. अंतरावर असलेल्या अति संवेदनाशिल व आदिवासी बहुल क्षेत्र असून ज़िम्मलगटा पासून १८ कि.मि.अंतरावर असलेल्या देचलीपेठा ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या गांवात स्वांतत्रच्या ७० वर्षानंतर सुद्धा या भागाचा विकास झाला नाही. या भागात अनेक प्रमुख समस्या आवासुन उभ्या आहेत. या गावांना जाण्यास आजही पक्के रस्ते नाहीत, पुल,विज नाहीत, पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत. मात्र याकडे शासन प्रशासन कडून दुर्लक्ष केले जात आहे.
मेटीगुड्ड्म येथे गाव निर्मितीपासून आम्ही मतदानाचा हक बजावुन लोकप्रतिनिधी निवडुन देत असतो मात्र स्थानिक क्षेत्रातून निवडुन आल्यानंतर मात्र याकडे दुर्लक्ष करत असतात.मात्र या गांवात केव्हाच येत नाही समस्या जाणून घेत नाहीत या परिसराला लागून नदी आहे त्यामुळे याठिकानी लिफ्ट ऐरीगेशन झाल्यास या परिसरातील शेतकरी सुजलाम सुफलाम होतील तसेच या परिसरात धानाची शेती जास्त प्रमाणात करत असतात मात्र या ठिकाणी या हंगामात आधारभूत धान खरेदी केंद्र जिम्मलगटा या ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना या परिसरातून धान नेत असताना आर्थिक व मानसिक त्रास सहन करवा लागतो त्यामुळे धान खरेदी केंद्र देचलीपेठा येथेच सुरू करण्यात यावी अशी विनंती नागिरकांनी केली. सदर धान खरेदी केंद्र या ठिकाणी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी सोबत चर्चा करू यावेळी जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सांगितले.
यावेळी नागरिकांसोबत तीन तास चर्चा करून समस्या ऐकून घेतले व निराकरण करून देण्याच्या ग्वाही दिली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
दिवाळी असल्याने दिवाळीच्या शुभेच्छा देत महिलांना फराळ व साड़ी भेट देण्यात आले.
या सभेच्या अध्यक्षस्थानी गाव पाटील गोसाई वेलादी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी सभापती सौ.सुरेखा आलाम, सरपंचा सौ.शांताबाई सिडाम, माजी सरपंचा मडावी, माजी सरपंच हंनमंतू सिडाम, ग्रा.प.सदस्या कु.यशोदा पोरतेट, नीलाताई सड़मेक, सत्यम नीलम, रामया मूलकरी, शिवराम पूल्लूरी, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, माजी उपसरपंच संजय पोरतेट, कार्तिक तोगम, नरेंद्र गरगम,आदि मंचावर उपस्थित होते. सभेचे संचालन व प्रस्ताविक डॉ.एस.नैताम यांनी केले तर आभार भीमराव मडावी यांनी मानले. यावेळी गावातील नागरिक,महिला बचत गटाचे महिला व युवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here