माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते टेनिस बॉल क्रिकेट व व्हॉलीबाल स्पर्धेचे उदघाटन

416

– डी कॅपिटल क्रीडा मंडळ दुबईच्या वतीने स्पर्धेचे आयोजन
The गडविश्व
भामरागड, २५ ऑक्टोबर : तालुक्यातील न.प.अतंर्गत येणाऱ्या दुब्बागुडम येथे डी कॅपिटल क्रीडा मंडळ दुबईच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट व व्हॉलीबाल स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे उदघाटन माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून तर दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.
यावेळी मंचावर सरपंच निलेश वेलादी, पेरमल्ली माजी सरपंच प्रमोद आत्राम, माजी सरपंच सुधाकर तिम्मा, अहेरी नगरपंचायत नगरसेवक प्रशात गोडसेलवार, तपेश भय्या हलदर, नरेंद्र गर्गम, लालसू आत्राम होते.
कार्यक्रमाच्या संचालन व आभार कोलू पुनगाठी यांनी मानले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कोलू पुंगाटी, उपाध्यक्ष राकेश पुंगाटी, कोषाध्यक्ष अमलू तेलामी, चैतु पिडसे, बना पंगाटी, राकेश पंगाटी, चैतु पिडसे, अमलू तेलामी, घिस्सु पंगाटी, डोलू वड्डे, पुसू तेलामी व गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here