जन साहस संस्था द्वारे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन

291

The गडविश्व
भंडारा : जिल्ह्यातील दवडीपार (बाजार) येथे जन साहस संस्थे द्वारे आधार हाउसिंग फाइनेंस लिमिटेड यांच्या आधारे आयुष्मान आधार कार्यक्रमाच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर राबविण्यात आले. या शिबिरामध्ये 0 ते 5 वर्षाखालील कुपोषित मुलांची तपासणी त्याचप्रमाणे गर्भवती महिला, तरुणी मुलींना चांगल्या सवयी व वाईट सवयी तसेच आरोग्याच्या बाबतीत काळजी कशी घ्यावी यावर मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरामध्ये 183 लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. तसेच कुपोषित मुलांना प्रोटीन पावडर वाटप काण्यात आले. त्याचबरोबर गर्भवती महिला, वृद्ध महिला, तरुण मुली व तिथे जमलेले ग्रामस्थ त्यांना महामारी पासून बचावासाठी मास्क, सेनेटाईजर , पैड्स इत्यादी सामग्रीचे वाटप केले. शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत औषधे वाटप करण्यात आली. शिबिरामध्ये मदतीसाठी अंगणवाडी कार्यकर्ता व आशा वर्कर होते. शिबीर आयोजन करण्यासाठी जन साहस संस्थे कडून राज्य समन्वयक प्रथमेश भावर, मनीष ठाकरे, सुशील आणि अनिकेत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here