चिमूर : मुरपार येथे वीज कोसळून शेतमजूर व बैलाचा मृत्यू

441

– शेतात काम करत असताना अचानक कोसळली वीज

The गडविश्व
चिमूर : तालुक्यातील मुरपार (तु) येथे वीज कोसळून शेतमजूर व बैलाचा मृत्य झाल्याची घटना काल बुधवार २९ जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. श्रीकृष्ण नेवारे (५०)असे मृत शेतमजूराचे नाव असून नानाजी दोडके यांच्या एका बैलाचा मृत्यू झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, काल बुधवार २९ जून रोजी श्रीकृष्ण नेवारे हे मुरपार येथील नानाजी दोडके यांच्या शेतशिवारात कुरपणी करत असतांना अचानकपणे विज कोसळली श्रीकृष्ण नेवारे व नानाजी दोडके यांचा एका बैलाचा मृत्य झाला. सदर घटनेची माहिती चिमूर पोलीसांना देण्यात आली.
सदर घटनेने नेवारे कुटुंबावर शोककळा पसरली असून घरचा कर्ता पुरूषाच्या मृत्यूने कुटुंबावर आभाळ कोसळले आहे तर ऐन शेतीच्या हंगामात बैलाचा मृत्यू झाल्याने दोडके यांचेही मोठे नुकसान झाले आहे. शासनाने सदर घटनेची दखल घेवून आर्थीक मदत दयाव अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here