चिमूर : नेरी येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

228

The गडविश्व
नेरी : येथील इसमाने घरात कुणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज २१ जानेवारी रोजी दुपारी 12 वाजताच्याच् सुमारास घडली. गंगाधर कवडू वांढरे अंदाजे वय 33 वर्ष रा. टिळक वार्ड क्रमांक 1 नेरी असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक गंगाधर वांढरे यास वृद्ध आई आणि एक भाऊ असा आप्त परिवार आहे. मात्र दोघेही भाऊ एकाच घरात वेगवेगळे राहत होते. गंगाधर यांचे 4 वर्षांपूर्वी विवाह झाला होता परंतु मागील वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीने घटस्फोट घेतला आणि माहेरी निघून गेली तेव्हा पासून गंगाधर हे एकटेच राहत होते. दरम्यान आज अचानक गंगाधरने आज दुपारच्या सुमारास घरात कोणी नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटनेची माहिती शेजारच्यांना कळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले प्रेत उत्तरनिय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविले. वृत्त लिहेस्तव आत्महत्याचे कारण कळू शकले नाही पुढील तपास नेरी पोलीस करीत आहे. सदर घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here