चकविरखल येथे स्व.नरेंद्र तांगडे यांच्या स्मूर्तीप्रित्यर्थ रक्तदान शिबीर संपन्न

138

– ३९ रक्तदात्यांनी केले रक्तदान
The गडविश्व
सावली : तालुक्यातील चकविरखल येथे स्व . नरेंद्र तांगडे यांच्या प्रथम स्मूर्तीप्रित्यर्थ रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात ३९ रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले.
या रक्तदान शिबीराचे उदघाटन गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष गडचिरोली महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले तर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी होते. उपाध्यक्ष म्हणुन शंकरराव सालोटकर, सावली माजी. तालुका अध्यक्ष कांग्रेस कमेटीराजुभाऊ सिध्दम हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सचिव काँग्रेस कमेटी गडचिरोली सुनिल चटगुलवार, पांडुरंगजी तांगडे, सामाजीक कार्यकर्तासुनिल बोमनवार, गायडोंगरीचे सरपंच मुक्तेश्वर आभारे , ईश्वरजी गंडाटे, गोविंदाजी बकाल, मंगलदासजी अलमस्त, मुखरुजी निकुरे, देवराव आभारे, शेखर नागापुरे उपस्थित होते.
यावेळी ३९ तरुण युवा रक्त दात्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मिथुन बाबनवाडे , दिवाकर बाबनवाडे, मधुकर बट्टे , सुखदेव बाबनवाडे, आंनदराव भोयर यांच्या सह अन्य युवकांनी व स्व.नरेंद्र तांगडे मित्र परिवार यांनी रक्तदान शिबीरासाठी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here