– १०० युनिटपर्यंत १० रुपये, तर ३०० युनिटपर्यंत ६० रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार
The गडविश्व
मुंबई : महागाईच्या भस्मासुराने सर्वसामन्यांचे आधीच कंबरडे मोडलेले असताना आता महावितरणच्या वीज दरवाढीमुळे घरगुती वीज ग्राहकांच्या खिशाला लागणार पुन्हा कात्री लागणार आहे.
कोळशाच्या दरवाढीमुळे ग्राहकांवर १० ते ६० रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. महावितरणच्या ग्राहकांना प्रति युनिट १० पैसे ते २५ पैसे जादा मोजावे लागणार असल्याने १०० युनिटपर्यंत १० रुपये, तर ३०० युनिटपर्यंत ६० रुपयांचा अतिरिक्त बोजा त्यांच्यावर पडणार आहे.
महाराष्ट्र वीज नियामकाने सर्व कंपन्यांना संपूर्ण राज्यासाठी वीज दर वाढवण्याची परवानगी दिली आहे. यासह, विक्रमी उच्च इंधन दरांचा हवाला देऊन उच्च वीज दरांना परवानगी देणाऱ्या राज्यांच्या वाढत्या यादीत महाराष्ट्र सामील झाला आहे.
४ एप्रिल रोजी, कर्नाटकने आपल्या ग्राहकांना १ एप्रिलपासून अतिरिक्त ३५ पैसे प्रति युनिट अदा करणार्या ग्राहकांसाठी उच्च दराची परवानगी दिली. तेलंगणाने पाच वर्षांच्या अंतरानंतर ५० पैसे प्रति युनिटने वीज दर वाढवला, तर आंध्र प्रदेशने देखील १.५७ रुपयांपर्यंत वीज दर वाढवला आहे.