ग्रामीण भागातील ३८ रुग्णांवर उपचार

229

– अबनपल्ली, निमगाव, तिरकामेटा येथे शिबीर
The गडविश्व
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील अबनपल्ली, धानोरा तालुक्यातील निमगाव व भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम अशा तिरकामेटा येथे व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून दारू सोडण्याची इच्छा असणाऱ्या 38 रुग्णांनी उपचार घेतला.
एटापल्ली तालुक्यातील अबनपल्ली येथील शिबिरात 12 रुग्णांनी उपचार घेतला आहे. क्लिनिकचे नियोजन व व्यवस्थापन तालुका संघटक किशोर मलेवार व प्रेरक रवींद्र वैरागडे यांनी केले. यशस्वीतेसाठी मुक्तिपथ गाव संघटन सदस्य सरपंच विलास गावडे, ग्रापं सदस्य गणेश गावडे, गाव पाटील तोंदे उसेंडी, दिनेश उसेंडी यांनी सहकार्य केले. भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम तिरकामेटा येथे गाव संघटनेच्या मागणीनुसार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात 14 रुग्णांनी नोंदणी करून पूर्ण उपचार केला. या उपक्रमाचे नियोजन तालुका संघटक आबिद शेख, रुपेश यांनी केले. यावेळी गाव संघटनेचे मुन्ना वेळदा, बिरजू वेळदा, महारु पल्लो, गाव पाटील कारू वेळदा उपस्थित होते. दोन्ही शिबिरांमध्ये रुग्णांची केस हिष्ट्री संयोजिका पूजा येल्लुरकर यांनी तर साईनाथ मोहुर्ले यांनी समुपदेशन केले.
धानोरा तालुक्यातील निमगाव येथे गावपातळी एकदिवसीय व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. क्लिनिकमध्ये एकूण 15 रुग्णांनी नोंदणी केली व 12 रुग्णांनी पुर्ण उपचार घेतला. केस हिष्ट्री प्रमोद कोटांगले यांनी घेतली. छत्रपती घवघवे यांनी रुग्णांना दारूचे दुष्परिणाम, धोक्याचे घटक सांगत समुपदेशन केले. भास्कर कड्यामी यानी शिबीराचे नियोजन केले. यशस्वीतेसाठी गाव संघटनेचे विश्वनाथ बोगा, कुमारशहा हलामी, सरपंच मोहन हलामी, शशिकला हलामी, अंगणवाडी सेविका हलामी, नरेश हलामी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here