गडचिरोली पोलीस दलामार्फत संवाद कौशल्य विषयावर भव्य कार्यशाळेचे आयोजन

443

The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांचे संवाद कौशल्य विकसीत व्हावे, याकरीता गडचिरोली पोलीस दल व आरभी क्रिएशन्स मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कार्यशाळेचे २८ मार्च २०२२ रोजी एकलव्य धाम गडचिरोली येथे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यशाळेत संवाद कौशल्य या विषयावर पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांनी आपले दैनंदिन कर्तव्य पार पाडत असतांना तक्रारदारांशी कशाप्रकारे संवाद साधावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले असुन स्वागत कक्षाचे महत्व सांगुन, तक्रारदार व इतर लोकांशी आपल्या संवाद कौशल्यातुन कसा समन्वय ठेवावा इत्यादि विषयावर चर्चेच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला. कार्यशाळेकरीता पोस्टे अहेरी, आष्टी, चामोर्शी, गडचिरोली, आरमोरी, वडसा (देसाईगंज), तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस मुख्यालयातील असे एकूण १०० ते १५० पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होते. यावेळी मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) शसमीर शेख सा. यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार यांना संवाद कौशल्याच्या माध्यमातून पोलीस दलास कसे अद्यावत केले जाऊ शकते हे सांगुन कार्यशाळेस उपस्थित अधिकारी व अंमलदार यांनी संवाद कौशल्य विकसित करण्याबाबत आपल्या सहकार्याना माहीती देवुन संवाद कौशल्याची अंमलबजावणी आपल्या दैनंदिन कामकाजात करावी, असे मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल सा. मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा. मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी अनुज तारे सा. यांचे मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आला असून, यावेळी कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा. कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका सांनिका कुलकर्णी आरभी क्रिएशन्स मुंबई हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रोपागंडा शाखेचे प्रभारी अधिकारी अशोक माने व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here