गडचिरोली जिल्ह्यात आज १९७ नवे बाधित तर १६७ कोरोनामुक्त

204

– एका सिकलसेलग्रस्त बाधीत व्यक्तीचा कोविडने मृत्यू
The गडविश्व
गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 992 कोरोना तपासण्यांपैकी 197 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 167 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 36682 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 34977 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 939 झाली आहे. आज नविन मृत्यूमध्ये सिरोंचा तालुक्यातील 17 वर्षीय मुलींचा (सिकलेसल ग्रस्त) समावेश आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 766 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.35 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.56 टक्के तर मृत्यू दर 2.09 टक्के झाला आहे.
आज 197 नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 21,अहेरी तालुक्यातील 03,भामरागड तालुक्यातील 55,आरमोरी तालुक्यातील 02, चामोर्शी तालुक्यातील 03, धानोरा तालुक्यातील 62, एटापल्ली तालुक्यातील 01, मुलचेरा तालुक्यातील 14, कोरची तालुक्यातील 20,कुरखेडा तालुक्यातील 12,आणि वडसा तालुक्यातील 04 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 167 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 29,अहेरी तालुक्यातील 07,आरमोरी तालुक्यातील 04,भामरागड तालुक्यातील 01,चामोर्शी तालुक्यातील 26,एटापल्ली तालुक्यातील 15, धानोरा तालुक्यातील 07, मुलचेरा तालुक्यातील02 सिरोंचा तालुक्यातील 02,कोरची तालुक्यातील 21,कुरखेडा तालुक्यातील 46,आणि वडसा तालुक्यातील 07 जणाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here