गडचिरोली : जिल्ह्यातील ५ नगरपंचायती मधील उर्वरीत ११ जागांसाठी ८५.३८ टक्के मतदान

154

– २० जानेवारी रोजी मत मोजणी

The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा, व कुरखेडा नगर पंचायतीच्या निवडणुकीकरीता सरासरी 85.38 टक्के मतदान झाले.
यात अहेरी नगरपंचायतीकरीता 649 मतदारांनी (स्त्री – 320, पुरुष – 329 मतदार, एकूण टक्केवारी 80.82 ), सिरोंचा नगर पंचायतीकरीता 900 मतदारांनी (स्त्री – 475, पुरुष – 425 मतदार, एकूण टक्केवारी 81.23 ), चामोर्शी येथे 2375 मतदारांनी (स्त्री – 1178, पुरुष – 1197 मतदार, एकूण टक्केवारी 88.32), धानोरा येथे 272 मतदारांनी (स्त्री – 141, पुरुष – 131 मतदार, एकूण टक्केवारी 89.77 ), कुरखेडा येथे 676 (स्त्री – 351, पुरुष – 325 मतदार, एकूण टक्केवारी 84.18 ), यांनी मतदानाचा हक्क बजावला.
सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरवात झाली. मतदानाची वेळ दुपारी 3.00 वाजेपर्यंत होती. यात सरासरी 85.38 टक्के मतदान झाले. पाच नगर पंचायतीच्या प्रभागासाठी निवडणूक घेण्यात आली. मत मोजणी 20 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती नगरपंचायत प्रशासन यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here