गडचिरोली : जिल्ह्यातील देसाईगंज आणि गडचिरोली नगर परिषदेचा कार्यभार आता प्रशासकाकडे

240

– उपविभागीय अधिकारी प्रशासक म्हणून काम पाहतील

THE गडविश्व
गडचिरोली : कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात अडचणी आल्याने मुदत संपत असलेल्या नगरपरिषदांवर प्रशासक नियुक्त करण्याचा आदेश नगरविकास मंत्रालयाने जारी केला होता. त्यामुळे संबंधित नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. तर कार्यकाळ संपल्याच्या तारखेपासून संबंधित उपविभागीय अधिकारी हे प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज नगर परिषदेचा १६ जानेवारी ला संपला तर गडचिरोली नगर परिषदेचा उद्या १८ जानेवारी रोजी संपणार आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीना यांनी देसाईगंज नगर परिषदेच्या प्रशासक पदी उपविभागीय अधिकारी जे.पी. लोंढे तर गडचिरोलीच्या प्रशासक पदी उपविभागीय अधिकारी आशिष येरेकर यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता नगर परिषदेचा कार्यभार आता प्रशासकाकडे असणार आहे.
यासोबतच पूर्व विदर्भातील गडचिरोलीसह तब्बल २८ नगरपरिषदांवर प्रशासक नियुक्त केले जाणार आहेत.

नगरपरिषद – मुदत

गडचिरोली – १८ जानेवारी

देसाईगंज – १६ जानेवारी

कामठी – १२ फेब्रुवारी

काटोल – ८ फेब्रुवारी

उमरेड – ८ फेब्रुवारी

कमळमेश्वर – ८ फेब्रुवारी

खापा – ८ फेब्रुवारी

मोहपा – ८ फेब्रुवारी

नरखेड – ८ फेब्रुवारी

रामटेक – ८ फेब्रुवारी

सावनेर – ८ फेब्रुवारी

भंडारा – ६ फेब्रुवारी

तुमसर – ७ फेब्रुवारी

पवनी – १५ जानेवारी

साकोली – १५ जानेवारी

गोंदिया – ९ फेब्रुवारी

तिरोडा – ९ फेब्रुवारी

सिंदेवाही – २६ डिसेंबर

बल्लारपूर – १ जानेवारी

वरोरा – ३० डिसेंबर

मुल – ३० डिसेंबर

राजुरा – ३० डिसेंबर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here