गडचिरोली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांमध्ये वाढ : आज आढळले १० बाधित, एकूण सक्रिय रुग्ण ३६

169

– आज ०२ कोरोनामुक्त
The गडविश्व
गडचिरोली, १२ जुलै : जिल्ह्यात आज 443 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 10 असून कोरोनामुक्ताची संख्या 02 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37600 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36789 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 36 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 775 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.84 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.10 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे.
आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 05, अहेरी तालुक्यातील 02, धानोरा तालुक्यातील 01, कोरची तालुक्यातील 01, व कुरखेडा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये धानोरा तालुक्यातील 01, व कोरची तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here