गडचिरोली जिल्हयात आज २४ नव्या बाधितांची नोंद तर १२० कोरोनामुक्त

175

The गडविश्व
गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 807 कोरोना तपासण्यांपैकी 24 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 120 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37104 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36033 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 301 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 770 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज दोन नविन मृत्यूमध्ये गडचिरोली तालुक्यातील चाभांर्डा येथील 64 वर्षीय पुरुष मेंदू संबंधीत आजाराने ग्रसीत व्यक्तीचा मृत्यू झाला तर देचलीपेठा ता. अहेरी येथील 65 वर्षीय पुरुष अस्थमा या आजाराने ग्रसीत व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.11 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.81 टक्के तर मृत्यू दर 2.08 टक्के झाला आहे.
आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 05, चामोर्शी तालुक्यातील 02, धानोरा तालुक्यातील 01, एटापल्ली तालुक्यातील 03, मुलचेरा तालुक्यातील 02, कोरची तालुक्यातील 11 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 120 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 16, अहेरी तालुक्यातील 14, चामोर्शी तालुक्यातील 34, धानोरा तालुक्यातील 04, एटापल्ली तालुक्यातील 05, मुलचेरा तालुक्यातील 29, सिरोंचा तालुक्यातील 05, कुरखेडा तालुक्यातील 05 आणि वडसा तालुक्यातील 08 जणाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here