गडचिरोली जिल्हयात आज १५४ नव्या बधितांची नोंद तर २७८ कोरोनामुक्त

213

– कोमॉर्बीड तिघांचा कोरोनाने मृत्यू
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यात आज 719 कोरोना तपासण्यांपैकी 154 नविन कोरोना बाधित आढळून आले आहेत तर 278 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 34858 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 32953 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1146 झाली आहे. तीन मृत्यूमध्ये अहेरी तालुक्यातील 72 वर्षीय पुरुषाचा श्वसन आजाराने, व 71 वर्षीय पुरुषाचा उच्च रक्तदाबामुळे, गडचिरोली तालुक्यातील 28 वर्षीय तरुणांचा किडनी आजाराने ग्रस्तचा समावेश आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 759 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.53 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.29 टक्के तर मृत्यू दर 2.18, गडचिरोली तालुक्यातील 28,अहेरी तालुक्यातील 10,आरमोरी तालुक्यातील 04,भामरागड तालुक्यातील 02, चामोर्शी तालुक्यातील 52, धानोरा तालुक्यातील 01, मुलचेरा तालुक्यातील 19,सिरोंचा तालुक्यातील 01, कोरची तालुक्यातील 09, कुरखेडा तालुक्यातील 03, आणि वडसा तालुक्यातील 22 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 278 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 95,अहेरी तालुक्यातील 01,आरमोरी तालुक्यातील 06,भामरागड तालुक्यातील 03,चामोर्शी तालुक्यातील 39,धानोरा तालुक्यातील 26, एटापल्ली तालुक्यातील 11,मुलेचरा तालुक्यातील 39,सिरोंचा 09,कोरची तालुक्यातील 05,कुरखेडा तालुक्यातील 30, आणि वडसा तालुक्यातील 14, जणाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here