The गडविश्व
गडचिरोली : राज्य माध्यमिक आणि उच्य माध्यमिक मंडळाच्या वतिने व राज्य शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार यंदा कोरोना नंतर प्रथमच स्थानिक शालेय केंद्रावर ऑफलाईन पध्दतीने पार पडलेल्या राज्य उच्य माध्यमिक परिक्षेत स्थानिक गडचिरोली येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणारा मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी शाम सुधीर झंझाळ या विद्यार्थ्यांने ९६.६७ टक्के गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे. त्याचे आम आदमी पार्टी गडचिरोलीच्या वतीने शाल पुष्पगुच्छ व स्पर्धा परीक्षेचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
शाम ने आपल्या यशाचे श्रेय आई वडिल व गुरुजनांना दिले आहे. शाम चे वडिल सुधीर झंझाळ हे आश्रम शाळा गिरोला येथे शिक्षक तर आई भूमिता गृहिणी आहेत. या सत्कार समारंभ प्रसंगी आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे, सचिव भास्कर इंगळे, शहर सघंटन मंत्री हितेंद्र गेडाम, एकनाथ गजबे, सावन सावसाकडे, सुधिर झंझाळ, भास्कर कोटांगले (आजोबा) इत्यादी उपस्थित होते.