खळबळजनक : हळदी समारंभादरम्यान महिला कोसळल्या विहिरीत, १३ महिलांचा बुडून मृत्यू

610

The गडविश्व
लखनऊ : लग्न समारंभाच्या कार्यक्रमावर विरजण पडल्याची धक्कादायक खळबळजनक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या कुशीनगर येथे अनेक महिला आणि मुली विहिरीत कोसळून १३ महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली काल बुधवारी रात्रोच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे-
सदर घटना विवाह समारंभातील हळदी कार्यक्रमादम्यान घडली. हळदी कार्यक्रमादरम्यान काही महिला आणि मुली एका विहिरीच्या जाळीवर उभ्या होत्या. दरम्यान अचानक त्यांच्या वजनाने जाळी तुटली आणि त्यावर उभ्या असलेल्या सर्व महिला आणि मुली विहिरीत कोसळल्या. यात १३ महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेबाबत परिसरात शोककळा पसरली असून लग्न समारंभावर जणू विरजणचा आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here