खळबळजनक : कचऱ्यात आढळले पाच भ्रूण

654

– परिसरात खळबळ, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
The गडविश्व
नागपूर : येथील लकडगंज परिसरातील क्वेटा कॉलनीत कचऱ्यात पाच भ्रूण आढळल्याची धक्कादायक घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नागपूर येथील क्वेटा कॉलोनी परिसरात मोकळ्या मैदानाच्या बाजूला असलेल्या वॉलकम्पाऊंड नजीकच्या कचऱ्यात ही भ्रूण सापडली आहेत.
परिसरातील नागरिकांनी याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर लकडगंज पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व तपास सुरू केला आहे. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटनास्थळ हे गर्दीची वस्ती असल्याने या ठिकाणी कोणी भ्रूण आणून टाकले याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
परिसरात काही हॉस्पीटल आहेत, पण हे परिसरातील बाहेरच्या हॉस्पीटलमधून कोणीतरी येथे आणून टाकल्याचा संशय व्यक्त करण्यात येते आहे. पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here