खळबळजनक : अर्धनग्न जळालेल्या अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह

1284

– ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान, जिल्हात खळबळ
The गडविश्व
गोंदिया : जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कुंभारटोली पाऊडदौना मार्गावरील महादेव पहाडी जंगल परिसरात एक तरुणीची अर्धनग्न जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना काल २१ एप्रिल रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून तरुणीवर अत्याचार करून नंतर हत्या करून ओळख पटू नये या करिता चेहरा जाळण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेमुळे जिल्हात खळबळ उडाली आहे.
आमगाव शहरालगत असलेल्या कुंभारटोली पाऊडदौना रोडवरील महादेव पहाडी परिसर जंगलाव्याप्त आहे. दररोज सकाळी गावातील नागरिक सकाळी फिरण्याकरिता तसेच काही लोक सरपण गोळा करण्याकरिता जात असतात. नेहमीप्रमाणे काल सकाळी काही लोक सरपण गोळा करण्याकरिता जंगल परिसरात गेले असता एका तरुणीचा अर्धनग्न मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती लगेच आमगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या तरुणीवर अत्याचार करून नंतर हत्या करण्यात आली असावी व ओळख पटू नये या करिता तोंडावर दुप्पट्टा टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. तरुणीचा चेहरा पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत असल्याने तिची ओळख पटविण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे झाले आहे. दरम्यान पोलिसांनी तपासचक्र अधिक गतीने फिरवून यातील आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. अधिक तपास आमगाव पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here