कोरची आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी दिला सुप्त गुणांचा परिचय

216

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव
THE गडविश्व

कोरची : ३ जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच जयपालसिंग मुंडा यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून शासकीय आश्रम शाळा कोरची येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक यु. यु. ढोक होते तर प्रमुख अतिथी म्हणून अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती कोरचीचे तालुका अध्यक्ष आशिष अग्रवाल, जितेंद्र सहारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मडावी उपस्थित होते. तर सदर कार्यक्रमामध्ये आर. एस. रामटेके, कु. एम.पी. सुरटकर, पि.के. मेश्राम, ए.एम. कायंदे, एच. के. कामडी, एम. आर. गजभिये, सौ. जे.डी. बंसोड़, बी.पी.कुरसंगे, कु. जी. एच. राऊत,सौ. एम.बी.हुकरे, कु.एस. एस.आंबोणे, जे.डी.गजभिये, डी.एम.ठाकरे, एस. के. शेंडे, ए. पी. मेश्राम, एस.बी. निर्वाण, पी.व्ही.बनसोड, कु.एन. व्ही.येंगलवार, कु. तृप्ती भोयर, व्ही. बी. मडावी, एम.के. पुसाम, एम. एन. पिलारे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि जयपालसिंग मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. ३ जानेवारी हा दिवस बालिका दिन तथा स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो त्यामुळे याप्रसंगी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, नृत्य स्पर्धा, एकपात्री प्रयोग, वेशभूषा स्पर्धा इत्यादी अनेक स्पर्धात्मक कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांना सुप्तगुणांना चालना मिळावी म्हणून नवचेतना उपक्रमाद्वारे वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. काही विद्यार्थिनींनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक ढोक यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनापासून धडा घेण्याचा सल्ला देताना जिद्द, चिकाटी, हिंमत अंगी बाळगण्याचा सल्ला दिला. प्रमुख अतिथी आशिष अग्रवाल यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना विद्यार्थिनींनी सावित्रीबाई पासून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त शिक्षण घेऊन समाजासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी स्वयंशासन घेण्यात आले यामध्ये विद्यार्थिनींनी मुख्याध्यापक व शिक्षकांची भूमिका पार पाडली. यामध्ये विद्यार्थिनींना अधिकार व कर्तव्याची जाणीव झाली. सदर कार्यक्रमाचे संचालन कु. बुद्धज्योती उंदीरवाडे वर्ग १२ वा हिने केले तर आभार कु. अंकिता वर्ग १२ वा हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद तथा विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाने अथक परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here