The गडविश्व
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर Work From Home सुरु केले होते. फक्त 25, तर कधी 50 टक्के कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात उपस्थित राहून काम करण्याची सूचना देण्यात येत होती. पण आता देशातील कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याने केंद्र सरकारने सर्व कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना उद्या 7 फेब्रुवारी पासून कार्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयातील 100 टक्के उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Home Breaking News केंद्र सरकारचा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय : उद्यापासून Work From Home बंद