कुरखेडा : कुंभीटोला तंटामुक्त समितीने लावून दिला प्रेमीयुगलांचा विवाह

216

The गडविश्व
कुरखेडा, १४ ऑगस्ट : तालुक्यातील कुंभीटोला तंटामुक्त समितीच्या मदतीने प्रेमीयुगल विवाह बंधनात अडकले आहे. काल शनिवार १३ ऑगस्‍ट रोजी तंटामुक्त समितीने प्रेमीयुगलांचा विवाह लावून दिला.
अविनाश विठ्ठल गेडाम रा. कुंभीटोला ता.पो. कुरखेडा जिल्हा. गडचिरोली याचे जयशाली न्याहामुर्ते रा.अंतरगाव पो. पुरडा ता. कुरखेडा जिल्हा. गडचिरोली हिच्याची प्रेम होते. दोघांचाही विवाह करण्याचा विचार होता. अविनाश गेडाम यांने स्वताच गाव गाठत तंटामुक्त समिती कुंभीटोला येथे विवाहाकरिता रितसर अर्ज केला. तंटामुक्त समितीने काल १३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता सीताबाई देवस्थान हनुमान मंदिर कुंभटोला येथे वर अविनाश विठ्ठल गेडाम व वधू जयशाली न्याहामुर्ते यांचा विवाह लावून दिला.
यावेळी सरपंचा किरणताई तलांडे, उपसरपंचा लताबाई सहारे, किशोर भांडारकर, विनोद नागपूरकर, मधुजी गावडे, परसराम मडावी, जयंत हरडे तसेच गावकरी
उपस्थित होते. यावेळी नव वधू-वरास शुभाशीर्वाद देऊन वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here