एमपीएससी ने गट ‘ब’ दर्जाची मुख्य परीक्षा पुढे ढकलली

373

The गडविश्व
मुंबई : राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट ब दर्जाच्या पदांसाठी मुख्य परीक्षा 29 जानेवारी, 30 जानेवारी, 5 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारीला होणार होत्या त्या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्या आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. आयोगाने गट ब विभागाची परीक्षा न्यायालयीन कारणामुळे पुढे ढकलली आहे.
या मुख्य परीक्षेआधी झालेल्या पूर्व परीक्षेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उत्तर पत्रिका तपासताना चूक झाल्याचा दावा काही विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. हा दावा करणाऱ्या 86 विद्यार्थ्यांकडून त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आयोगाने उत्तर पत्रिका तपासताना चूक केल्याने आपली मुख्य परीक्षा देण्याची संधी एक किंवा दोन गुणांनी हुकल्याचा या विद्यार्थ्यांचा दावा होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने या विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात परीक्षा देण्यास परवानगी देण्यात यावी असा निर्णय दिला होता. त्यानंतर इतरही उमेदवारांनी त्यांनाही आयोगाच्या चुकीमुळे एक किंवा दोन कमी मिळाले आणि मुख्य परीक्षेची संधी हुकल्याचा दावा करत न्यायालयात धाव घेतली होती.
ज्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देता आली नाही, त्या विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली. ही सुनावणी पूर्व परीक्षा गट ब साठी असणार आहे. मुख्य परीक्षा देण्याची संधी आम्हालाही देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे. या याचिकेवर 2 फेब्रुवारीला होणार आहे. या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देते याकडे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here