एकलव्य मॉडल रेसिडेंशीयल स्कूल येथे जननायक बिरसा मुंडा यांची जयंती उत्साह साजरी

147

The गडविश्व
गडचिरोली, १५ नोव्हेंबर : एकलव्य मॉडल रेसिडेंशीयल स्कूल चामोर्शी व गवर्धा ( स्थित गडचिरोली) येथे मंगळवार १५ नोव्हेंबर २०२२ आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शाळेचे प्राचार्य एस. के. लांडे यांनी बिरसामुंडा यांचा प्रतिमेला माल्यार्पण करून बिरसा मुंडा यांचा विचारांचे प्रतिपादन करून आदिवासीनी आपली संस्कृतींचे संरक्षण करण्याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमामध्ये विदयार्थ्यांनी भाषणातून भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी कु. पल्लवी मेश्राम मॅडम, कु. वाढे मॅडम, कु. सय्यद मॅडम, बोबाटे, नैताम, कोजवार, पिलारे , तथा कलाक्षपवार आदिनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here