अतिदुर्गम भागातील ११५ स्पर्धकांचा मुक्तीपथ मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग

104

– अवैध दारूविक्री विरोधात संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न
The गडविश्व
गडचिरोली, १५ नोव्हेंबर : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मिरगुडवांचा, हिंदेवाडा व कोयनगुडा येथे गाव संघटनेच्या सहकार्याने रन फॉर मुक्तिपथ मॅरेथॉन दौड स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण ११५ स्पर्धकांनी सहभाग दर्शविला होता. त्यानंतर सभेचे आयोजन करून गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.
तालुक्यातील मिरगुडवांचा येथे रन फॉर मुक्तिपथ मॅरेथॉन दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दारू मुक्तीची मशाल पेटवून करण्यात आली.  या स्पर्धेमध्ये गावातील महिला, पुरुष, युवक , युवती असे एकूण ४५ खेळाडूंनी  सहभाग घेतला. यावेळी उपसरपंच कोमटी महाका, चीना दुर्वा, कन्न दुर्वा  यांच्यासह गावकरी उपस्थित होते. हिंदेवाडा येथे अयोजित  रन फॉर मुक्तिपथ मॅरेथॉन दौड स्पर्धेत ४० स्पर्धक सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला संजय वेलादी, राकेश तिम्मा, जिजाताई, मनोज तिम्मा  यांनी सहकार्य केले. कोयनगुडा  येथेही पार पडलेल्या स्पर्धेमध्ये गावातील महिला, पुरुष, युवक , युवती  असे एकूण ३० खेळाडू  सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला वासू हबका, शशी मडावी  यांनी सहकार्य केले. तिन्ही गावांमध्ये आयोजित स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या स्पर्धकाला मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
विशेष म्हणजे, स्पर्धेचे रूपांतर सभेत करून  अवैध दारू व तंबाखूविक्री विरोधी असलेल्या कायद्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. सोबतच दारुबंदीशिवाय गावाचा विकास शक्य नसल्याचे पटवून देण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन मुक्तीपथ कार्यकर्ता आबिद शेख व विद्या पुंगाटी यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here