उद्या ‘नीट’ ची परीक्षा ; जिल्ह्यात १४४ कलम लागू

563

– परीक्षेकरिता प्रशासनाकडून बसेसची सुविधा
– गरजूंनी जिल्हास्तरीय हॉट लाइनला संपर्क साधण्याचे प्रशासनाचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, १६ जुलै : राष्ट्रीय परीक्षा एजेंसी मार्फत घेण्यात येणारी National Eligibility Cum Entrance Test (UG)-2022 (NEET Exam-2022) उद्या रविवार १७ जुलै २०२२ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील विविध परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार असल्याने परीक्षा संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे व परिक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत परीक्षा कालावधीत विवक्षीत कृती करण्यापासून परावृत्त करणे तसेच शांतता तथा सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक आहे. जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ अन्वये असलेल्या अधिकाराचा वापर करुन परिक्षा केंद्राच्या १०० मिटरच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर, पानपट्टी,टायपिंग सेंटर, एस टी डी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमानां परिक्षा सुरु होण्यापुर्वी दोन तास व परीक्षा सुरु असण्याचा संपुर्ण कालावधीत बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. परीक्षेकरिता प्रशासनाकडून बसेसची सुविधा करण्यात आली आहे.
परिक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन,सेल्यूलर फोन,फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस/वाहनास प्रवेशास मनाई राहील. तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती परीक्षार्थी व परिक्षेसी संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळून एकत्रितरित्या प्रवेश करण्यास मनाई आहे. कोणत्याही व्यक्तीकडून परिक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतेही बाधा उत्पन्न करु नये. तसेच परिक्षा केंद्राचे परिसरात परिक्षेच्या कालावधित ध्वनीप्रदुषणामुळे परिक्षार्थिंना त्रास होईल असे कृत्य करु नये. कोवीड-१९ चे अनुषंगाने,शासनाने वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या नियमावलीचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. असेही आदेश निर्गमीत केले आहे.
हे आदेश परिक्षा केद्रावर काम करणारे अधिकारी,कर्मचारी,परीक्षार्थी,निगराणी करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे बाबत त्याचे परिक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागु राहणार नाही.तसेच हे आदेश १७ जुलै २०२२ रोजी सकाळी ७.०० वाजेपासून सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत परीक्षेच्या दिवशी गडचिरेाली येथील सर्व संबंधित परीक्षा केंद्राचे ठिकाणी लागू राहतील असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

परीक्षेकरिता प्रशासनाकडून बसेसची सुविधा, गरजूंनी जिल्हास्तरीय हॉट लाइनला संपर्क साधण्याचे प्रशासनाचे आवाहन

भामरागड, एटापल्ली, अहेरी व सिरोंचा या तालुक्यातील NEET ची परिक्षा देणारे विद्यार्थी गडचिरोली येथील परिक्षा केंद्रावर येण्याकरीता बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना गडचिरोली येथील परिक्षा केंद्रावर येण्यासाठी वाहतुकीची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यास अशा विद्यार्थ्यांसाठी बसेसच्या सुविधेकरीता संपर्क : प्रा.धर्मेंद्र मुनघाटे, मो. क्र. 9423646711 व अमरसिंग गेडाम (वि.अ.) मो.नं. 7517229099 व शैलेश दमके, (व.सहा.) 7304884059 यांचेशी संपर्क साधावा. गरजू विद्यार्थ्यांना बसेसचे नियोजन आज शनिवार १६ जुलै २०२२ रोजी दुपारी १२ .०० वाजता पर्यंत कळविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here